पक्षादेश झुगारून लावत मित्रपक्षांच्या आघाडी विरोधात प्रचार करणे काँग्रेस कार्यकर्ती श्रुती म्हात्रे यांना महाग पडणार आहे.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अविनाश पांडे यांनी या बाबत श्रुती म्हात्रे यांना याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या संघटनात्मक कार्यकुशलतेमुळे त्यांच्या निधना पश्चातसुद्धा त्यांना मानणारा फार मोठा कामगार वर्ग आहे. श्याम म्हात्रे यांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या उत्तराधिकारी श्रुती म्हात्रे आहेत. एक जबाबदार कार्यकर्ती या नात्याने त्यांनी आघाडी धर्म पाळणे गरजेचे होते.परंतु श्रुती यांनी उरण मतदारसंघांमध्ये उघडउघड आघाडीच्या विरोधात काम करण्यास प्रारंभ केला. याचाच परिपाक म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अविनाश पांडे यांनी सांगितले की म्हात्रे यांना स्पष्टीकरण देण्यासाठी चोवीस तासांचा अवधी देण्यात आला आहे.या दरम्यान त्यांनी काहीही न कळवल्यास त्यांना काही सांगायचे नाही असे गृहीत धरून त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

अवश्य वाचा