आगरदांडा 

 मुरुड तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीला  नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.मुरूड तालुक्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसा कडकडीत ऊन पडते. सायंकाळी मात्र अचानक आभाळ भरून येऊन जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे . परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला आहे. कापणीयोग्य पीक शेतात आडवे झाल्याने उत्पादनात घट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.