कोर्लई,ता.१९

आगामी दि.२१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग-मुरुड मतदार संघाचे शे.का.पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे  उमेदवार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात असून ते या निवडणुकीत निश्चितपणे निवडून येतील.असा विश्वास मुरुड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत कमाने यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण मतदार संघात पंडितशेठ पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात असून मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.मजगांव मध्ये प्रचार रॅलीत माजी सभापती चंद्रकांत कमाने, संतोष जमनू, प्रशांत मिठागरी, अजित कासार,अतिष आयरकर,इजाज सुभेदार, अजित आयरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मजगांव उपसरपंच योगेंद्र गोयजी,इम्तियाज मलबारी, हमीद परदेशी, संदीप मुरुडकर, विजय धसाडे, प्रदीप पाटील,रुपेश गोयजी,मियाजान कादीरी, रमेश मोरे, कृष्णा कांबळी यांसह शे.का.पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग-मुरुड मतदार संघाचे उमेदवार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील निश्चितपणे निवडून येतील.असा विश्वास चंद्रकांत कमाने यांनी व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'