चिपळूण 

महाराष्ट्र विधानसभेच्या सोमवारी (२१ ऑक्टोबर) होणाऱ्या निवडणूकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा घटनादत्त अधिकार दिलेला आहे. मतदारांनी कर्तव्य भावनेने, नकाराधिकार अर्थात ‘नोटा’ (NONE OF THE ABOVE) हा पर्याय न वापरता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन चिपळूणातील साहित्यिकांनी केले आहे. नामवंत कवी आणि बोलीभाषांचे अभ्यासक अरुण इंगवले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोणबरे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे, संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार धनंजय चितळे, इतिहासाचे नामवंत अभ्यासक प्रकाश देशपांडे, ग्रामीण कथाकार रविंद्र गुरव, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, कवी चंद्रकांत राठोड, लेखिका स्मिता देवधर, प्रा. अंजली बर्वे, शाहीर-शीघ्रकवी राष्ट्रपाल सावंत, वक्ते मंदार ओक, कैसर देसाई यांनी हे आवाहन केले आहे.

 

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.