कर्जत - दि.18

                  कर्जत तालुक्यातील भातपिकावर मोठ्या प्रमाणात खोडकिडा पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण आणि तालुका अध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी एका पत्राद्वारे  जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

          कर्जत तालुका हा कृषीप्रधान तालुका असून येथील लोकांचे बहुतांशी जीवन शेतीवर अवलंबून आहे, भातशेती शिवाय उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन येथील शेतकरी वर्गाला उपलब्ध नाही, यावर्षी खरीप हंगामातील पाऊस लांबल्यामुळे निसवण्याच्या अवस्थेत भातशेतीवर मोठ्या प्रमाणात खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे, राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांपुढील या संकटाकडे कोणाचे  लक्ष नाही, विशेषतः तालुक्यातील राजनाला विभागातील उशिरा लागवड झालेल्या भातशेतीवरील खोडकिड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून हाती आलेले पीक जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

             अश्या खोडकिड्याग्रस्त हजारो एकर वरील उभ्या भातपिकांचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसानभरपाई मिळावीअशी मागणी केली आहे.

अवश्य वाचा