खांब-रोहे,दि.१७

     रोहे तालुक्यातील धानकान्हे येथे मंदिर सभाग्रुहात शेती शाळा हा क्रुषी विषयक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

             शासनाच्या क्रुषीविषयक विविध प्रकारच्या योजनांची शेतकरी वर्गाला माहिती व्हावी या उद्देशाने गेल्या सहा महिन्यापासून सदरचा अभिनव उपक्रम क्रुषी विभागाचे माध्यमातून धानकान्हे येथे राबविण्यात येत आहे. तर नुकतीच संपन्न झालेला क्रुषीवर्ग हा आठवा वर्ग होता.तर या कार्यक्रम प्रसंगी यावेळी तालुका क्रुषी अधिकारी कुमार जाधव, नागोठणे क्रुषी पर्यवेक्षक जे.एल.मढवी,कडसुरे क्रुषी सहा.एन.जी.जामकर, चिल्हे क्रुषी सहा.सारिका सावंत आदींसह अर्जुन कचरे,धोंडू कचरे,महादेव माहित,सखारामकचरे,पांडुरंग गोसावी, सहादेव कचरे,महेश कचरे,प्रकाश गायकवाड, गुणाजी जाधव,भुरा पवार,क्रुष्णा जाधव,तारामती पवार आदींसह मोठ्या संख्येने विभागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

         यावेळी शासनाच्या शेतीसाठीच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन,चतुसुत्री भात लागवड,गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना,शेतकरी विमा योजना,पिक विमा योजना,मागेल त्याला शेततळे आदी योजनांची माहिती उपस्थित अधिकारी वर्गाकडून देण्यात आली व शासनांच्या विचार विविध योजनांचा लाभ घेण्याचे अवाहनही यावेळी करण्यात आले.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.