पाताळगंगा १६ ,ऑक्टोबर

        तालुक्यांच्या ठिकाणी दर पावसाळ्यात भात शेतीची लागवड शेतकरी वर्ग करीत असतो.शेतामध्ये लावलेल्या भात शेतीच्या लोंब्या मध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे भात शेतीने जणू सोनेरी शाल परिधान केली आहे.की असा भास जणू येथून जाणा-या वाटसरूला पडत असल्याचे भासत आहे. भातशेतीच्या लोंब्या मध्ये दाणा तयार झाले काही ठिकाणी भात कापणी सुरु झाली आहे.मात्र परतीच्या पावसाच्या भितीने भात कापणी खोळंबळी आहे.  परतीच्या पावसाचा अंदाज घेवून एक आठवड्यामध्ये भात कापणीस सुरुवात केली असे प्राथमिक अंदाज शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.

                परतीचा पाऊस आजही बळीराजाच्या पाठ सोडत नसल्यामुळे भात शेती तयार झाली असली तरी सुद्धा भात कापणी करण्यास बळीराजाच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जर भात कापणी केली आणी पाऊस पडला तर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू शकते. ते होऊ नये म्हणून शेतकरी एक आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज घेवून भात कापणीला सुरुवात करणार आहे असे मत शेतात काम करीत असलेल्या शेतक-यांनी व्यक्त केले.शेतीचे पिके हि शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाची वाटतात.शिवाय  शेती मुळे  काही जणांना रोजगार मिळत असते.यामुळे तालुक्याच्या ठिकाणी दर वर्षी भात लागवड केली जात असते.                     

          परतीच्या पावसामुळे बळी राजा मोठ्या संकटात सापडले आहे.शिवाय गेले काही दिवस हस्त नक्षत्राच्या पावसाने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून घेत असल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार झाल्यामुळें भात शेती तीच्या वजनांने पडत आहे.त्याच बरोबर दिवसा प्रखर उष्णतेमुळे भाताच्या लोंब्या पासून दाणा अलग होत.असल्यामुळे हातात हवे तेवढ्या दाणा पहावयास मिळणार नाहीं.यामुळे बळीराजा मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.भाते  कापण्यायोग्य झाली आहे मात्र परतीच्या पावसाचा अंदाज घेवून एक आठवड्यात भात कापणी केली जाईल असे मत शेतात काम करणारे अतिष म्हात्रे ( वयाल )यांनी प्रतिनिधी शी बोलतांना व्यक्त केले.

अवश्य वाचा