पाताळगंगा, १५ ऑक्टोबर 

कोकणात आंबा आणि हे पीक शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.शिवाय कोकणातील फळांचा राजा आंबा असे संबोधले जाते.वातावरणाच्या सातत्याने बदलामुळे या फळांच्यावर विपरीत परिणाम तसेच उत्पन्न घटले जात आहे.हिवाळा हा ऋतू सुरु होताच या वृक्षांना मोहर येत असतो.मात्र आलेला मोहर वाचवावे तसेच ३० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या, आंबा, या उत्पादन कमी झालेल्या बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दोन वर्षांमध्ये चांगले उत्पादन मिळू शकेल.यासाठी कृषि तंत्रज्ञान यंत्रणा ( आत्मा ) अंतर्गत यांच्या माध्यमातून आंबा पुनरुज्जीवन प्रशिक्षण रामेती खोपोली येथे  घेण्यात आले.   

कोकणातील असलेले सर्वच वृक्ष आपल्यासाठी  मोठे वरदान लाभले आहे.यापासून आपल्याला शुद्ध हवा च्या समवेत आर्थिक उत्पन्न ही मिळवून देत आहे,यामध्ये प्रामुख्याने आंबा हे सर्वात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.मात्र १० वर्ष अथवा त्या पेक्षा जास्त वर्ष झालेले वृक्ष अल्प पीक देत असेल तर त्यासाठी शेतकरी वर्गासाठी मार्गदर्शन  आयोजन करण्यात येत आहे.यामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये बहुतेक आंबा बागा पारंपरिक पद्धतीने १० मी. बाय १० मी. अंतरावर लावलेल्या आहेत. वाढत्या वयासोबत झाडांतील शरीरक्रिया संथ होतात. फक्त खोडाची वाढ होऊन आंबा झाडांमध्ये सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्पर्धा वाढल्यामुळे झाडे उंच वाढली असून, फलधारणा झाडाच्या शेंड्यालगत होत आहे.  परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. अनियमित फळधारणा,  कमी आकाराची फळे, कमी उत्पादनक्षमता, संयुक्त फुलाचे अत्यल्प प्रमाण, इ. बाबींमुळे महाराष्ट्रातील आंबा उत्पादकता कमी झालेली दिसून येते

जुन्या वृक्षा मध्ये सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही,बागांमधील फांद्या एकमेकांवर शिरकाव ; करतात, त्यामुळे किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन मोहोर गळून जाऊन उत्पादनात घट होते.अश्या जुन्या आंबा बागेमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी रोग व किडीचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने मोहोर, तसेच फळ गळतात.पुनरुज्जीवन म्हणजे छाटणी करून झाडाचा विस्तार आटोपशीर व मर्यादित ठेवून पाने व फांद्या अधिक सशक्त व जोमदार बनविणे. जेणेकरून झाडापासून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळावे. केवळ झाडांची खरड छाटणी करणे म्हणजेच पुनरुज्जीवन असा सर्वसाधारण समज आहे. झाडांची छाटणी करणे ही पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमधील पहिली पायरी आहे.                       

पुनरुज्जीवनासाठी आंब्याची छाटणी केल्यानंतर झाड मोहोर व फळे येण्यायोग्य होण्यास सर्वसाधारणपणे दोन वर्षाचा कालावधी लागतो. या काळात योग्य खत व्यवस्थापन, झाडाचे रोग व किडीपासून संरक्षण तसेच पॅक्‍लोब्युट्राझॉलचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा लागतो. छाटणीनंतर झाडाची योग्य काळजी न घेतल्यास, मोहोर येण्यास व उत्पादन सुरू होण्यास जास्त कालावधी लागू शकतो, पहिल्याप्रमाणे अथवा कमी उत्पन्न मिळू शकते हे आंबा बागायतदारांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी बागांचे पुनरुज्जीवन यांच्यावरती मार्गदर्शन केल,मंडळ कृषी अधिकारी- महेंद्र सालके,कृषी साहाय्यक - उदय भोसले,कृषी अधिकारी सारीका ढुके,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक - प्रज्ञा पाटील,कृषी परिवेक्षक खालापूर - संतराम धुमाळ,कृषी परिवेक्षक चौल नितिन महाडिक,तसेच तालुका कृषी अधिकारी आणी शेतकरी वर्ग उपस्थित होते.

 

अवश्य वाचा