चिपळूण 

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा गड राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांना 'सर' करता यावा यासाठी शहरातील पाग येथील असंख्य नागरिकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.रास्ट्रवादीतील नेत्रुत्वातील बदलाने नागरिकांमध्ये बदल होतोय. उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली हे नागरिक श्री. निकम यांना आमदार करण्यासाठी एकवटले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गोटात आणखी खळबळ उडाली आहे.

येत्या २१ तारखेला विधानसभेची निवडणूक होतं आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि सेनेत जोरदार लढत होणार अशी अटकळ आहे. मागील निवडणुकीत श्री. निकम यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. परंतु ते शल्य झटकून त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात आपल्या कामाची नव्याने बांधणी केली आहेत तुषार खेतल यांचा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्याने त्यांचे समर्थक खुप नाराज आहेत त्यांना आज शेखर सरांशीवाय पर्याय राहिलेला नाही अशातच सरांचा असलेला सर्व समावेशक स्वभावाने केलेली निस्वार्थीपणाची कामे . पाणी योजना . दुर्गम भागातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. साहजिकच यामुळे त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदार त्यांना जाहीरपणे पाठिंबा देत आहेत. 

चिपळूण शहरातील पाग नाका येथील हजारो नागरिकही 'सरां'च्या कार्यपध्दतीने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हे नागरिक विधानसभा निवडणुकीत श्री. निकम यांना मतदान करणार आहेत. येथील स्थानिक नगरसेवक श्री. भोजने यांच्या पुढाकाराने रविवारी या नागरिकांसमवेत श्री. निकम यांनी बैठक घेतली. पाठींब्याबद्दल आभार व्यक्त करतानाच श्री. निकम यांनी 'आमदार' झाल्यास येशील सर्व प्रश्नांचा, कामांचा निपटारा करू, असे आश्वासन दिले. त्यांचा पाग नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, माजी नगराध्यक्षा सौ. वृषाली कांबळी, पंचायत समिती सदस्य नितीन उर्फ अबू ठसाळे व शेकडो नागरिक उपस्थित होते.

 

अवश्य वाचा