चिपळूण 

   विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी व इंदिरा काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचाराचा देवरुख मधील शुभारंभ ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरात नारळ ठेवून तर मंदिरासमोर श्रीफळ फोडून करण्यात आला.यावेळी  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब ढवळे, शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सौ प्रेरणा पुसाळकर, सौ वणकुद्रे, बाबा सावंत, मोहन वनकर, अनिल भुवड यांच्यासह कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे २०० पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

     यावेळी शेखर निकम याना आमदार होण्यापासून कोणीही रोखु शकत नाही. देवरुख शहरातून सरांना सर्वाधिक मताधिक्क्य देणार असल्याचे हानिफ हरचिरकर यांनी सांगितले.

अवश्य वाचा