पाताळगंगा ११ ऑक्टोबर,

          गेले अनेक दिवस परतीचा पाउस शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्यामुळे तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार झाला असून त्यातच सायंकाळी पावसाची जोरदार बॅटींग आणी सोसाट्यांचा वारा यामुळे भात शेती पडत आहे.काही ठिकाणी भात कापणी योग्य झाली आहे.मात्र परतीचा पाऊस सायंकाळी येत असल्यामुळे भात कापणी केली तर हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळणार आशि भिती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. 

         सायंकाळी जोरदार पाउस, यामुळे भात शेती पडत असून त्याचबरोबर शेतामध्ये पाणी जमा होत असल्यामुळे भात शेती कुजत चालली आहे.मात्र गेल्या काही दिवसापासून हस्त नक्षत्रांचा पाऊस शेतकरी वर्गांस मारक ठरत आहे.दर वर्षी भात लागवड करायची आणी शेवटच्या क्षणांला भात शेतीचे प्रचंड नुकसान यामुळे मातीत टाकलेला पैसा धान्याच्या माध्यमातून मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहे.

               भात शेती कापण्यायोग्य झाली असूनही परतीच्या पावसाच्या भितीने फक्त भात शेतीचे होत असलेले नुकसान पाहण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी हवाळदिन झाला आहे.तालुक्यातील असलेली भात शेती अनेक ठिकाणी ओस पडत चालली आहे. यांचे कारण म्हणजे मातीत टाकलेला पैसा वसूल होत नाही.शिवाय हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळत नाही या तसेच परतीचा पाउस हे सर्व अस्मानी संकटाचा दर वर्षी शेतकरी वर्गास सामना करावा लागत असल्यामुळे भात शेती अल्प होत आहे. मात्र असे असले तरी सुद्धा तालुक्यात गेल्या काही वर्षात तुरळक स्वरूपात भात लागवड करण्यास वाढ झाली आहे. मात्र परतीच्या पावसाची दहशत आजही बळीराजास चिंताग्रस्त करून ठेवले आहे.

 

अवश्य वाचा