नेरळ,ता.10

                    जोरदार पावसामुळे मिनिट्रेन बंद झाली आणि माथेरान चे पर्यटन कमी झाले व माथेरान करांचे जीवनमान चिंतामय झाले.यासाठी माथेरान करांनी मध्य रेल्वे चेडी.आर.एम.संजीवकुमार जैन यांची भेट घेऊन ही मिनिट्रेन दिवाळी पर्यटन हंगामा अगोदर सुरू करावी याबाबत डी.आर.एम.यांच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले.

                     त्यावर त्यांनी अभियंत्यांची टीम पाहणीसाठी पाठवली पण त्यांच्या कडून काही अपेक्षित घडलंच नाही,दुसऱ्या वेळेला स्टेशनची पहाणी करून लोको शेड ची जागा निश्चित करण्यासाठी येऊन माथेरानकरांकडे मदतीचा हात मागितला त्याला येथील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दाखवला व 9 ऑक्टोबरला लोको शेड करण्यासाठी वाहनतळ शेजारील जमीन निश्चित करून आखणी केली या तिन्ही वेळेस काम कधी पूर्ण होणार असे विचारले असता अधिकारी काढता पाय घेत आहे.एकीकडे आम्ही काम करतो असे दाखवतात व एकीकडे कामचुकार पणा करतात या दुटप्पी धोरणांमुळे अधिकाऱ्यांवरील विश्वास उडाला असल्यामुळे आता करो की मरो ही भूमिका घेऊन माथेरान कर 14 ऑक्टोबर ला मोठे जन आंदोलन उभारणार आहे.

                 याबाबत 10 तारखेला आंदोलन होणार होते पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही पण आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने येथील स्थानिकांनी टोकाची भूमिका घेतली आहे.याच्या नियोजनासाठी येथील राम मंदिर येथे सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली.या बैठकी मध्ये सर्वांनी एकमताने आंदोलन करण्याचा सूर आळवला. 10 तारखेला सकाळी अकरा वाजता माथेरानच्या सर्व विभागामध्ये लोकांना संघटित करण्यासाठी रॅली काढण्यात आली.या रॅलीला माथेरान करांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रॅलीला सर्व पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.

 

अवश्य वाचा