नेरळ,त.10

                           देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती माथेरान मध्ये पाहायला मिळाली सेल्फी काढण्याच्या नादात 400 फूट खोल दरीत पडून सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात येथील रेस्क्यू टीमला यश आले आहे.

                           अजित प्रभाकर बर्वे वय वर्षे 62 असे या गृहस्थाचे नाव असून तो विले पार्ले मुंबई येथील राहणारा आहे.दोन दिवस माथेरान मधील एका हॉटेल मध्ये तो एकटाच पोलिसांच्या परवानगीने राहत होता.9 तारखेला हॉटेल मधून चेक आउट केला होता.10 तारखेला अजित हा सकाळी साडे नऊ वाजता एको पॉईंट फिरण्यासाठी गेला असता सुरक्षा कठडे ओलांडून दरी न्याहाळत मोबाईल ने सेल्फी काढत होता.हिरवे गवत ओले असल्याने अचानक त्यांचा पाय घसरला व ते 400 फूट खोल दरीत कोसळले.पण दैव बलवत्तर म्हणून तो डोंगरा च्या अर्ध्यात अडकून राहिला व वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागला.त्यानुसार या पॉईंट वर असलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले.

                         त्यानुसार पोलीस हवालदार सुनील पाटील,नारायण बार्शी, पोलीस नाईक महेंद्र राठोड,पोलीस शिपाई प्रशान्त गायकवाड,राहुल पाटील,राहुल मुंढे यांनी घटनास्थळी गाठले.व रेस्क्यू टीमचे सुनील कोळी,सुनील ढोले,अमित कोळी,अक्षय परब, उमेश मोरे,संतोष केळगणे, अमोल सकपाळ,दिनेश सुतार यांना पाचारण केले दरीत दोरीच्या साहाय्याने उतरून तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अजित याना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.त्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांच्या शरीरावर कुठेही इजा झाली नाही.पण पोलिसांनी जबाबदारीनं त्यांना येथील बी जे रुग्णालयात दाखल केले.

 

अवश्य वाचा