गोवे-कोलाड 

    रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे ग्रामस्थांचे आराध्य ग्रामदैवत धाक्सुद महाराजांचा नवरात्र उत्सव येथील युवक युवती ग्रामस्थ व महिला मंडळांनी नऊ दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

         यावेळी येथील युवक युवती ग्रामस्थ व महिला मंडळांनी अतिशय परिश्रम घेऊन मंदिरा सभोतील व गावातील प्लास्टिकमुक्त प्रतिज्ञा घेत स्वच्छता केली येथे नवरात्र उत्सवात मंदिरातील ग्रामदेवतासह मूर्तींना वस्त्र व मुखवटे दाग दागिने घालून सजविण्यात आले तसेच येथील ग्रामस्त दरवोज मोठ्या संख्येने मंदिरात सकाळी काकडाआरती सायंकाळी हरिपाठ भजन प्रवचन कीर्तन व विविध आध्यत्मिक अशा कार्यक्रमात दंग होत होते.

           २९ सप्टेंबर ते ९ ऑक्टो या कालावधीत संपन्न झालेल्या सालाबादप्रमाणे यावर्षी ग्राम दैवत श्री धाक्सुद महाराजांची पालखी ढोल ताश्यांच्या गजरात व फटक्यांच्या आतश बाजीत हि पालखी संपूर्ण गावात फिरविण्यात आली या उत्सवाला आळंदीहून आलेले ज्ञानज्योती धर्म शाळेचे मठाधिपती ह भ प पंडित महाराज नागरगोजे कोलाड विभागीय पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे साहाय्यक घासे पवार यांची उपस्थिती लाभली तसेच हभप महादेव महाडिक राम लोखंडे किशोर लोखंडे नारायण लोखंडे नारायण महाडिक ज्ञानेश्वर लोखंडे गणपत शिंदे तुकाराम महाडिक धनाजी महाडिक धनाजी लोखंडे गणपत घायले प्रमोद शिंदे मंगेश लोखंडे नथुराम कोंडे गणपत शिंदे गाव कमिटीचे अध्यक्ष सुधीर लोखंडे तुकाराम महाडिक सुरेश महाडिक गजानन जंगम दगडू लाडगे  परशुराम कोंडे सुनील महाडिक मारुती खांडेकरसर ग्राम दैवताचे पुजारी काशिराम घायले आदी ग्रामस्त युवक युवती व महिला मंडळ बहुसख्खेने उपस्तीत होते.

       या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष सुजित लोखंडे,  नितीन शिंदे ,मयूर कोंडे, , अजय, विजय कोंडे, नितेश कोंडे, राकेश महाडिक,प्रसाद लोखंडे,प्रीतेश लोखंडे,केतन शिंदे,सौरव महाडिक,रोशन कोंडे,स्वप्नील महाडिक ,सह मंडळाच्या सर्व पदाधिकारी युवती व ग्रामस्थांना अथक परिश्रम घेतले.

उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता शेवटी महाप्रसाद भोजनांनी करण्यात आली असून यशस्वीतेसाठी श्री धाक्सुद मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ महिला मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

अवश्य वाचा