पेण 

पेण तालुक्यात सर्वच स्तरातून स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली असली तरी वाढत्या डास , मच्छरांमुळे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम फेल गेल्याचे दिसून येत आहे.पेण तालुक्यात सांडपाणी , झाडी झुडपी, जुनी घरे व इमारती,पडीक भंगार साहित्य,साठलेले पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून जुलै ते डिसेंबर या महिन्यात डासांच्या माद्या अंडी घालून डासांची पैदास होत असल्याने या काळात मलेरिया , हिवतापा बरोबरच डेंग्यूचे विषाणू पसरण्याची भीती जास्त प्रमाणात असून या गंभीर व जिवघेण्य समस्ये कडे सबंधीत विभागाने वेळीच लक्ष दिले नाहि तर वेळ प्रसंगी माणुस दगावण्याची शकत असल्याने पेण तालुक्यात नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धूर फवारणी करण्याची गरज आहे.डेंग्यू व मलेरिया हे डास व मच्छरांच्या चावल्याने विषाणूंमुळे होते तर डासांचे वेग वेगळे प्रकार असून डोळ्यांची जळजळ , रक्तातील रोग प्रतिकारक पेशी कमी होणे , उलट्या होणे, अचानक जस्त ताप येणे , शौच्यास काळी होणे, डोके दुखी , सांधेदुखी , त्वचेवर चट्टे उठणे ,अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.यादरम्यान रुग्णावर वेळीस उपचार झाले नाहि तर रुग्ण दगावण्याची शक्याता जास्त असते.वृृृद्ध व एक वर्षावरील बालकास या आजाराची लागण लगेच होते तर या बाबत पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार दिवसभराच्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार १० ते २० टक्के रुग्णांना मलेरिया तसेच डेंग्यू सद्रृष्य लक्षणे दिसून येतात,  त्यांच्यावर उपचार करण्यात हि येत आहेत तसेच त्यांच्यावर अधिक औषधांचा डोस देण्याची गरज आहे तर अधिक माहिती वरिष्ठ विभागाकडून मिळू शकते असे सांगण्यात आले.

अवश्य वाचा