गोवे-कोलाड

     मुबंई गोवा महामार्गावरील खांब येथील एच पी पेट्रोल पंप शेजारील हॉटेल श्रीकार समोरील गार्डनमध्ये 9 ऑक्टो रोजी सायंकालच्या सुमारास एका बैलाचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदरील घटनेचा पुगाव ग्रामस्थांनी एकच संताप व्यक्त केला आहे.

            सदर या विषयाची सविस्तर माहिती अशी की मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या पुगाव खांब दरम्यातील एच पी पेट्रोल पंप शेजारील नामवंत असा हॉटेल श्रीकारच्या समोरील गार्डनमध्ये विद्युत रोषणाई खांब उभे करून त्यावरील लावलेल्या पथदिव्या साठी हॉटेल ते गार्डन यासाठी विद्युत पुरवठा करणारी शंभर ते दीडशे मीटर अंतराची केबल टाकण्यात  आली होती परंतु या वीज पुरवठा होत असलेल्या केबलकडे हॉटेल मालकाचा दुर्लक्षित कारभारामुळे आज पुगाव येथील एका गरीब शेतकरी हरिश्चंद्र धुपकर यांच्या बैलाला येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीद्वारे विद्युत शॉक लागून या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

       नेहमीच  शेतीच्या कामासाठी मेहता असलेला बैल विद्युत शॉक लागून मृत्यू झाला अशी माहिती मालक हरिश्चंद्र धुपकर यांना मिळताच ते गावातील ग्रामस्थांसह घटनास्थळी  पोहचले तर  बैल विद्युत शॉक लागून मृत्यू पडला आहे तर बाजूला वीज पुरवठा करणारी जॉईंट केलेली केबल बाहेर पडली हे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी संबंधित हॉटेल मालक व कोलाड येथील महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली परंतु काम करणारा लाख मोलाचा बैल मृत्यू झाल्याने शेतकरी धुपकर शोकुल झाला आहे.

         तरी सदर या गंभीर घटनेची  संबधित अधिकारी वर्गाने दखल घेऊन शेतकरी धुपकर यांना तातकाल मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुगाव खांब दरम्यान एच पी पेट्रोल पंप शेजारील हॉटेल श्रीकार येथे विद्युत शॉक लागून बैल मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

अवश्य वाचा