गडब 

        सार्वजनिक विद्यामंदीर ज्युनियर काॅलेज पेणचा विद्यार्थी कामेश किशोर कोठेकर याची शालेय राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

       मालाड - मुबंई येथे झालेल्या 19 वर्ष मुले  वयोगटातील शालेय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक ज्युनियर काॅलेज पेण संघाने तृतीय क्रमांक मिळविला या संघातील खेळांडु कामेश कोठेकर यांने अष्टपैलु खेळ करुन आपल्या संघास तृतीय क्रमांक मिळवुन दिला. या त्याच्या कामगिरी बद्दल नाशिक येथे होणा-या शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विभागाचे संघात निवड झाली आहे.

         कामेश कोठेकर याची राज्यस्तरिय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विभागाचे संघात निवड झाल्या बद्दल सार्वजनिक ज्युनियर काॅलेज पेणचे प्रार्चाय, शिक्षक, श्रीराम क्रिडा मंडळ गडबचे पदाधिकारी आदिनी अभिनंदन केले आहे.

अवश्य वाचा