बोर्ली प़चतन 

श्रीवर्धन तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या महावितरण विभागाकडुन धडक विज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.

विद्युत विभागाकडुन वेळोवेळी थकबाकी वसुलीसाठी अशी मोहीम विज ग्राहकांना गावागावात पुर्वसुचना देऊन ग्राहकांना थकबाकी त्वरीत भरण्याचे आवाहन करण्यात येते परंतु यावेळी महावितरणकडुन कोणतीही पुर्वसुचना न देता या विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन विजबिल वसुली करीत आहेत ग्राहकांनी आपली विजबिले ही वेळेत भरुन शासनाला सहकार्य केले पाहीजे याबाबत कोणाचेही दुमत नाही.परंतु ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या वसुलीमागे शासनाला बदनाम करण्याचा छुपा हेतु तर नाही ना अशीसुध्दा चर्चा ऐकायला मिळत आहे.  

विज मंडळाचे कर्मचारी जसे तत्परतेने वसुलीचे काम करीत आहेत तीच तत्परता ग्राहकांना भेडसावणा-या समस्यांबाबत दाखवली तर वेळेत विजबिल भरणा-या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

वाढीव येणारी विजबिले यासाठी लोकांना आपला दिवस मोडुन श्रिवर्धला जावे लागते ऊशीराने येणारी विजबिले,  काही ग्रहाकान बील पोच न करणे रिडीग लाख सर्वत्र न फिरणे वेळच्या वेळी बिल वसुली न करणे थक बाकी झालेवर वसुली करुन घेण्या साठी विज ग्रहाकाना वेठीस धरणे वीजपुरवठा खंडीत झाल्यावर तक्रार देऊनसुध्दा कर्मचारी जाग्यावर नसल्याचे कारण देऊन ग्राहकांना अंधारात ठेवणे काही वेळा तक्रार धारकांच्या तक्रारीचे  नीवारण सवडी नुसार सांयकाळी करणे आशा अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. 

वसुलीबरोबरच विज ग्राहकांच्या या गंभीर समस्येबाबत कर्मचाऱ्यांनी वसंबधीत आधीकार्यानी तत्परता दाखवावी असे  मत  नागरीकांनी आमच्या प्रतिनीधीजवळ व्यक्त केले.

अवश्य वाचा