सुधागड-पाली दि.१० ऑक्टोंबर २०१९

पाली येथील बँक ऑफ इंडिया व  युनिकेयर हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संपुर्ण आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक उपचार शिबिर दि.१० ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. पाली येथील मरीमाता मंदीर मध्ये हे आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. शिबिरात जवळपास १२५ गरीब व गरजू रुग्णांवर संपुर्ण आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक उपचार शिबिराच्या माध्यमातून नाडी परीक्षण, बी. एम. आय.व  बॉडी फॅट  ,मधुमेह , आहार सल्ला, डॉक्टर सल्ला, देण्यातआले.

या शिबिराचे उद्घाटन राजेन्द्र प्रसाद गुप्ता शाखा अधिकारी सुधागड पाली व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी व कर्मचारीवर्ग  डॉ. राजेंद्र कदम निलेश उबळे,पूर्णिमा घरत ,विशाल जाधव ,प्रियंका ठाकूर ,स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.

 सुधागड तालुक्यात आदिवासी व दरडोई उत्पन्न कमी असलेले लोक अधिक आहेत. त्याबरोबरच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांना पदरमोड करून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते.  मात्र खाजगी दवाखान्यात उपचारसाठी भरमसाठ रक्कम मोजावी लागत असल्याने उपचार घेणे अवघड होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन गोरगरिबांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी बँक ऑफ इंडिया  शाखा सुधागड पाली व युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावरील तज्ञ डॉक्टरांमार्फत सेवा देण्यात आली. यावेळी १२५ रुग्णांची तपासणी  त्यामध्ये  हृदयविकार, संधिवात, हृदयविकार, मोटापा, मधुमेह,रक्तदाब, केस व त्वचाविकार, मणक्याचे आजार, थायरॉईड,दमा, मुळव्याध, मुतखडा,  अशा रुग्णांना मोफत तपासणी करण्यात आली.

अवश्य वाचा