अलिबाग,

       विद्यानगर(पश्चिम)येथील साईनगर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाची मंगळवारी(दि. ८ऑक्टोबर) यशस्वी सांगता झाली. देवीच्या विसर्जन मिरवणुकीत महिला,पुरुष,तरुणाईने संगीताच्या तालावर गरबा खेळून मनमुराद आनंद लुटला. मिरवणूक सुरु असतांना अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी देवीचे दर्शन घेतले यावेळी मंडळाच्या वतीने  त्यांना फुलझाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त चोख होता,समुद्र किनारी अलिबागचे पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांचा फुलझाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला तसेच महिला पोलिसांचाही फुलझाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. शिस्तबद्ध मिरवणुकीने अलिबाग येथील समुद्रात रात्री देवीच्या मूर्तीचे भक्तिभावाने योग्यप्रकारे विसर्जन करण्यात आले.

         नवरात्रोत्सवात  प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशव्याचा वापर करण्याचा संदेश प्रसारित करून उभारलेल्या देखाव्याबरोबरच कार्यक्रमाच्या ठिकाणी  यावर्षी प्रथमच पारंपारिक गोंधळाचे आयोजन केले होते,कातळपाडा-कुसुम्बळे येथील पिटकीरी गोंधळी मंडळाने  कार्यक्रमाच्या ठिकाणी भवानी देवीची पूजा मांडली आणि सौ . वर्षा आणि श्री .अभय पाटील या उभयतांनी पूजा केली तर गोंधळींनी  पारंपरिक वाद्यांचा  उपयोग करून गोंधळ गीते सादर केली. नवरात्रोत्सवात अष्टमीची होमहवन पूजा सौ.सुप्रिया व श्री. सचिन पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. जोगवा मागणे,भोंडला, हळदीकुंकू,चित्रकला, चमचा लिंबू, संगीतखुर्ची,फॅन्सी ड्रेस,विविध गुणदर्शन,गरबानृत्ये,ज्येष्ठ महिलांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण आदी कार्यक्रमांनी हा नवरात्रोत्सव उत्साहात, जल्लोषात यशस्वीपणे संपन्न झाला.यासाठी मंडळाचे पदाधिकारी, महिला आणि पुरुष सभासद ,लहानथोर ग्रामस्थ  आदींनी फार परिश्रम घेतले.

अवश्य वाचा