उरण दि 9(विठ्ठल ममताबादे)दिवसेंदिवस शेतकरी कामगार पक्षाची ताकत वाढत चालली असून अनेक युवकांनी, इतर पक्षातिल कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. दिवसेंदिवस विवेक पाटिल यांच्या प्रचाराला बळ वाढतच चालले आहे. उरण विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभुमीवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पी आर पी महाआघाडीचे उमेदवार विवेक शंकर पाटिल यांना उरण उत्कर्ष समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे आपले मत व्यक्त करून अध्यक्ष गोपाळ पाटिल यांनी आपला जाहिर पाठिंबा दिला आहे.

 

उरण विधानसभेचे उमेदवार तथा शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटिल हे 1979 पासून 2014 पर्यंत जिल्हा परिषद तसेच विधान सभेत लोकप्रतिनिधि म्हणून कार्यरत होते. त्यांनी जन हिताची अनेक कामे उरण विभागात मार्गी लावली. वेळ प्रसंगी अनेक आंदोलने उभी केली. तसेच उरण मधील विविध समस्यांची  विवेक पाटिल यांना पूर्ण जाण आहे. त्याच प्रमाणे बहुजन समाजाच्या समस्याचीही त्यांना जाण आहे. ते समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय व मानसिक क्षमता त्यांच्या कडे आहे. बुजगावना लोकप्रतिनिधि निवडून उरणकरांनी 5 वर्षे वाया घालविलि व आता ड़बक्यात राहुन दिल्लीच्या गोष्टि करणारा खोटारडा लोकप्रतिनिधि निवडून उरणकरांनी आत्मघातकिपणा करु नये असे विनम्र आवाहन उरण उत्कर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळ पाटिल यांनी केले आहे. दरम्यान गोपाळ पाटिल यांच्या उरण उत्कर्ष समितीच्या पाठिंब्यामुळे विवेक पाटिल यांच्या मतदानात भरघोस वाढ होणार असल्याने विवेक पाटिल यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !