कर्नाळा : उरण

महाराष्ट्राच्या विधी मंडळात उरणचे प्रतिनिधीत्व करण्यात मा. आमदार विवेक पाटील यांच्यासारखे अभ्यासू, प्रामाणिक, आणि प्राणांतिक आजाराला सुद्धा न डगमगता खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व हवे आहे. उरण मतदार संघातील बहुतांश नागरिकांची हीच धारणा झाली असल्याकारणाने शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष आघाडीचे उमेद्वार मा. आमदार विवेक पाटील यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. अशा परिस्थितीत गुरुवार दि. ९ ऑक्टोबर २०१९ रोजी कळंबुसरे गावातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मा. आमदार विवेक पाटील यांना पाठिंबा देवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना भाजपचे कार्यकर्ते म्हणाले की, आमच्या नेत्यांनी पक्षाशी गद्दारी करत निवडणुक लढविण्याचा चंग  बांधला आहे. त्यांच्या स्वार्थी आणि हेकेखोर राजकारणापाठी फरफटत  जाणे आम्हाला मंजुर नाही. गेली ५ वर्षे उरणची जनता समस्यांनी ग्रस्त आहे. या समस्या सोडवून उरणला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची ताकद मा. आमदार विवेक पाटील यांच्या ठायी असल्याने आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे मा. आमदार विवेक पाटील यांच्या विजयासाठी झटणार आहोत.

अवश्य वाचा