सांगोला

प्रत्येक भारतीय मतदाराला मतदानाचा अधिकार आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला अमुल्य असे महत्त्व असून एखाद्या व्यक्तीचे एक मत राजकीय समिकरण ठरविण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकते. याच हेतूने समाजातील प्रत्येकाला आपल्या मताचे दान देता यावे म्हणून निवडणूक आयोगाकडून नेहमीच चांगल्या सोयी-सुविधा देण्यात येतात. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा 
2019 मध्येही दिव्यांग बांधवांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणे सोपे व सुलभ जावे म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी खास ""पी.डब्ल्यू.डी.''ऍपची सोय करण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तीमध्ये अंधकर्णबधीरमुकबधीरअस्थिव्यंगयाचबरोबर अनेक प्रकारच्या शारीरिक व्यंग असणाऱ्यांचा समावेश होतो परंतु तेही देशाचे नागरिक असल्यामुळे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचा मुलभूत अधिकार असून मतदानाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. मतदानासाठी दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत घेवून जाणे व आणणे यासाठी कंटाळा करण्याचे प्रकार होत असल्यामुळे याच दिव्यांगांना निवडणूक आयोगाकडून तसेच प्रशासनाकडून घरपासून ते मतदान केंद्रापर्यंत मतदानसाठी घेवून जाण्यासाठीची सोय करण्यात येणार आहे.

""पी.डब्ल्यू.डी.''ऍपचा वापर करुन दिव्यांग व्यक्ती म्हणून नोंद करण्याची विनंतीदिव्यांग नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी विनंती करणेमतदार यादीतील नावाची हस्तांतरण करण्यासाठी विनंतीमतदार यादीतील नावामध्ये सुधारणा अथवा नाव वगळण्यासाठी विनंती करणेव्हीलचेअर साठी विनंतीमतदान केंद शोधणेअर्जाची स्थिती तपासणेअशाप्रकारच्या सुविधा दिव्यांग मतदारांना घरबसल्या अगदी मिळणार असल्यामुळे दिव्यांग बांधवांना लोकशाहीच्या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी होता येणार आहे. तर वंचित न राहो कोणी मतदार या निवडणूक प्रशासनाच्या ध्येयाला यश मिळवून देणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

ग्रामीण भागातील दिव्यांगांना या ""पी.डब्ल्यू.डी.''ऍपचा उपयोग खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात होणार असून निवडणूकीत होणारी त्यांची हेडसांड थांबणार आहे. मतदानासाठी तासन्‌तास रांगेत उभा राहाण्या

अवश्य वाचा