खेड 

 विधानसभा निवडणुकीत खरी लढत तुल्यबळ उमेदवारांच्यात असते.जर नावात साम्य असेल तर अनेकदा मतदार गोंधळून नावात साम्य असलेल्या उमेदवाराला मतदान करतात .त्यामुळे काही मते त्यांच्या पारड्यात पडतात.यांचा काहीसा परिणाम  तुल्यबळ उमेदवारांवरही होत असतो .चिन्हांकडे न पाहता नावाप्रमाणे मतदान केले तर हा गोंधळ होऊ शकताे. त्यामुळे अशा युक्त्या निवडणुकात वापरल्या जातात.दापोली विधानसभा मतदारसंघात खरी लढत शिवसेनेचे योगेश रामदास कदम व राष्ट्रवादीचे संजय वसंत  कदम यांच्यात आहे .परंतु त्यांच्या नावात साधर्म्य असलेले आणखीन तीन अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून अपक्ष उभे आहेत संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम ,संजय संभाजी कदम असे हे उमेदवार आहेत . यामुळे या मतदार संघात संजय कदम नावाचे चार उमेदवार झाले आहेत. तर शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांच्या व्यतिरिक्त योगेश दीपक कदम या नावाचा अपक्ष उमेदवार उभा आहे. नावातील साधर्म्यामुळे अनेक वेळा मते चुकीच्या उमेदवाराला जाऊ शकतात त्याचा फायदा घेण्यासाठी अशाप्रकारे अपक्ष उमेदवार विविध पक्षांकडून उभे केले जातात .

अवश्य वाचा