सुतारवाडी दि. 9 

सुतारवाडी याठिकाणी माझे वडील कै. दत्ताजीराव गणपत तटकरे आणि स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब रसाळ यांनी दसरा स्नेहसंमेलन आणि गोविंदा हे सण सुरू केले. आज या गोष्टीला पन्नास वर्ष होऊन गेले तरी आमची तिसरी पिढी असंख्य चाहत्या समवेत तितक्याच उत्साहाने साजरा करत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी येरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बापूसाहेब रसाळ  सभागृहात दसरा स्नेह संमेलन प्रसंगी काढले. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर ग्रामपंचायत येरळ आणि कुडली, जामगाव ग्रामपंचायती तर्फे खासदार सुनील तटकरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती मोतीराम तेलंगे, जि.प सदस्य दयाराम पवार, कुडली सरपंच अश्विनी कामथेकर,  पहूर सरपंच मंगेश कदम, तानाजी जाधव,  जयप्रकाश रसाळ, येरळ सरपंच विमल दळवी,  रामचंद्र चितळकर, तानाजी देशमुख,  सुरेश महाबळे आदींचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले गेल्या वर्षी दसरा स्नेहसंमेलनाच्या दिवशी मी इथे आलो होतो तेव्हा आमदार म्हणून निवृत्त झालो होतो. सर्वांच्या पुण्याइने आज दसरा संमेलनाच्या दिवशी मी खासदार म्हणून आहे. नव्या वर्षाची नवी पहाट अशी अबाधित राहिल हे आम्ही जपले आहे. आज येथील पंचक्रोशीतील महिला,  भगिनी नवीन काम करत आहेत. एकीचे बळ दाखवत आहेत. या कार्यक्रमाद्वारे हृदया पलीकडे नाते जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी सुतारवाडीवाशी आहे. मला पंधरा मंत्र्यांची पत्र आली आहेत ती सुनील दत्तात्रेय तटकरे सुतारवाडी या नावाने याचा मला अभिमान आहे. मी मुंबई ते दिल्ली प्रवास करत असताना विमानात असलेले पुस्तक चाळले त्यात सुतारवाडी,  धगडवाडी,  येरळ ही नाव वाचून आनंद झाला. म्हणजे आपल्या गावाची नाव दिल्लीपर्यंत गेली आहेत याचा मला मोठा अभिमान वाटतो. गोविंदा आणि दसरा स्नेहसंमेलन हे कार्यक्रम चुकविणे हे माझ्या आयुष्यात कधीच होणार नाही. पुढील संकल्पना जपण्यासाठी आणि आनादी काळापासून आलेले उपक्रम राबविण्यासाठी आपण एकत्र येतो. एकीचे बळ पुढील काळातही आपण असेच दाखवू असे भावपूर्ण उदगार खासदार सुनील तटकरे यांनी ग्रामस्थ तसेच उपस्थित ग्रामीण भागातील जनतेला सांगितले. शेवटी सोनं लुटणे हा कार्यक्रम पारंपारिक कार्यक्रम पार पडला.

 

अवश्य वाचा