सुधागड-पाली


सुधागड तालुक्यातील महावितरणाचा भोगल कारभार सुरु आसुन घोटावडे ग्रामपंचायततीचे तांबडमाल गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहेत. या बाबत सतत महावितरणकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे  माजी सभापती पिटू ढुमणा यांनी सांगितले आहे.दि.५ ऑक्टोंबर रोजी कोसळलेल्या जोरदार  पावसामुळे तांबडमाळ येथील दोन विद्युत खांब पडले होते. विद्युत खांब पडून घरांवर जिवंत विद्युत तारा पडल्या नशीब बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नाही. धोकादायक झालेल्या विद्युत खांबाचे अनेकदा तक्रार देण्यात आली होती. महावितरणाकडे  तक्रारीकरुन दुर्लक्ष केले गेले अखेर  दि. 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या सुमारास जोराच्या वाऱ्यामध्ये  विद्युत खांब कोसळले. तेव्हा पासुन आजतागायत तांबडमाल ग्रामस्थ अंधारात आहेत.महावितरण तांबडमाल ग्रामस्थांच्या तक्रारीकडे का जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा अरोप ग्रामस्थ करत आहेत.महावितरणाच्या दूर्लक्षपणामुळे  गेल्या चार दिवसांपासून वीजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. 

याबाबत  महावितरणाचे  अधिकारी यांना ग्रामस्थांकडून  संपर्क केला असता वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले जात आहे. मात्र, चार दिवस होऊनही याकडे कोणीच फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आलेला आहे.

अवश्य वाचा