रोहे तालुका आदीवासी ठाकूर क्रिकेट प्रीमियर लीगची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहिर झाली असून अध्यक्ष पदि तिसऱ्यांदा गोविंद शिद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
                    रोहे तालुका आदिवासी ठाकूर समाज क्रिकेट प्रीमियर लीगची सभा नूक्तिच नागोठणे येथे पार पडली. या सभेत सर्वानुमते अध्यक्ष पदी सलग तिसऱ्यांदा गोविंद शिंद यांची निवड करण्यात आली तर,उपाध्यक्ष पदी,जयेश हंबीर ,सचिव ,खेळू हंबीर ,खजिनदार जाणू ढुमना  यांची निवड करण्यात आली आहे.
                    यावेळी सखाराम ढुमना ,नरेश शिद , प्रकाश शिद ,भागोजी हंबीर ,देवा डोके,राकेश वारगुडे,तुकाराम शिद,कृष्णा निरगुडे,विजय हंबीर,खेळू लेंडी,लक्ष्मण सुतक,महेंद्र भल्ला,संतोष पिंगळे आदी रोहे तालुक्यातील आदिवासी नागरीक,तसेच ढोकवाडी,उनाठवाडी , काळकाई ,चेराठी,वाडा,गणपतवाडी सुकेळी , खैरवाडी, निविठाकूरवाडी,केलदवाडी, खातेली, पांगलोली ,उसर,उसारठाकूरवाडी , शिरसेवाडी, फणसवाडी इत्यादी वाड्यांचे बहू संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अवश्य वाचा