मोहोपाडा

जिल्हास्तरीय स्केटिंग प्रतियोगिता २०१९ चे आयोजन याक पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. यामध्ये श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्राविण्याच्या जोरावर विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा गटातून आपआपल्या नैपुण्याचे प्रदर्शन केले. 

सदरची स्केटिंग प्रतियोगिता हि ११ वर्षे, १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटाखालील विद्यार्थ्यांसाठी क्वाड स्केटिंग व इनलाईन स्केटिंग या प्रकारात घेण्यात आली. यामध्ये इनलाइन स्केटिंग प्रकारात गीतेश सावंत(११ वर्षाखालील), नाविन्य पवार (१७ वर्षाखालील) यांनी प्रथम स्थान तर युग बोरोले (११ वर्षाखालील), देव पटेल (१४ वर्षाखालील), राहुल जोशी (१७ वर्षाखालील) यांनी तृतीय स्थान पटकावले. याशिवाय क्वाड स्केटिंग प्रकारात शैल सणस (१७ वर्षाखालील) याने प्रथम स्थान तर ध्यान चोपडा (११ वर्षाखालील), नियम विराणी (१७ वर्षाखालील) यांनी द्वितीय स्थान आणि आदित्य मिरकुटे (१४ वर्षाखालील) याने तृतीय स्थान पटकाविले. 

सर्व सहभागी, विजयी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक प.पू. योगेश्वरस्वरूपदास स्वामी, प.पू. आत्मस्वरूपदास स्वामी तसेच प्राचार्य जॉन्सन व शिक्षक आणि शिक्षकेतरवृन्दानी अभिनंदन व कौतुक केले.

अवश्य वाचा