चालू महिन्याच्या 21 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांचे व अनेक संघटना त्याचप्रमाणे अपेक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावर उभे राहणार आहेत. 193 श्रीवर्धन विधानसभा   मतदारसंघांमध्ये देखील निवडणूक होणार आहे. या मतदारसंघांमध्ये श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव,तळा, रोहा इत्यादी तालुक्यांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदरच्या सार्वत्रिक निवडणुका नि:पक्षपातीपणे त्याचप्रमाणे शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेला अतिशय काटेकोरपणे आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच अनुषंगाने आज श्रीवर्धन शहरातील श्रीवर्धन परिवहन बस स्थानकापासून बाजारपेठ करदमे मोहल्ला, प्रभू आळी अशा एसटी राउंड मार्गाने पोलिसांचे ध्वजसंचलन करण्यात आले. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, श्रीवर्धनचे पोलिस निरीक्षक पी.डी. बाबर, म्हसळा पोलीस निरीक्षक खेडकर, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, श्रीवर्धनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अली मुल्ला त्याचप्रमाणे म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस दीपक धुस,तसेच श्रीवर्धन, म्हसळे, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, त्याचप्रमाणे दंगल विरोधी पथक माणगाव, तसेच होमगार्ड यांचे संयुक्त ध्वजसंचलन श्रीवर्धन शहरात आयोजित करण्यात आले होते.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत