नागाव (हर्षल मोरे)

खोपोली येथे  पार पडलेल्या मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेत आवास येथील बा.ना. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये 14 वर्ष वयोगटातील 54किलो वजनी गटात मनीषा गुरम हीने प्रथम तर  58 किलो वजनी गटात सुरक्षा थळे हिने  प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 17वर्ष  वयोगटात 110 किलो वजनी गटात जित नाईक प्रथम तर 19वर्ष वयोगटातील 62 किलो किलो वजनीगटात सेजल राऊळ प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शाळेतर्फे विजयी खेळाडू तसेच मार्गदर्शक श्री भगत यांचे  शाळेचे मुख्याद्यापक व  शाळाकमिटीने अभिनंदन केले.

अवश्य वाचा