आगरदांडा   

      मुरुड तालुक्यातील पंचक्रोशीतील भागातील गावात भात पिकावर करपा रोगाची लागण झाली आहे.बुरशी जन्य करपा रोगामुळे भाताच्या पाकळ्यांचे दोन भाग पडून तयार होणाऱ्या दाण्यास धोका पोहचत असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी वर्गांनी केली आहे.मुरुड तालुक्यात भातशेती चे लागवड क्षेत्र ३९०० हेकटरक्षेत्र असून भात पीक महत्वाचे मानले जाते. सुरवातीला चांगला पाऊस पडला.परंतू शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस पडल्याने भातशेतीला परिणाम होवुन भातशेतीला करपा रोग झाला त्यामुळे शेतकरीवर्ग पुर्णता हैराण झाले आहे.अचानक हा रोग आल्याने भात पिकाचे उत्पन्न कमी होणार अशी भीती मुरुड तालुक्यातील शेतकरी वर्गात पडली आहे.

      करपा रोगाच्या फैलाबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे.गावातील शेतकरी हा अगोदरच गरीब भाताची शेती लावण्यासाठी इतरांकडून कर्ज काढून शेती करीत असतो त्यातच या करपा रोगाने डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्याचे कसे होणार हा प्रमुख प्रश्न त्यांनी आमच्या प्रतिनिधीपाशी व्यक्त केला आहे.समजा एखाद्या शेतकऱ्यास एका शेतातून ५० मण भात मिळत असेल तर जर याच शेताला करपा रोगाची लागण झाली तर हेच उत्पादन २५ मण म्हणजेच अर्ध्यावर येणार आहे.करपा रोगाचा जोराचा प्रर्दूभाव होण्याअगोदर तातडीने कृषी खात्याने उपाय योजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गा कढून होत आहे.

  करपा रोगाबाबत मुरुड तालुक्याचे कृषी अधिकारी सुरज नामदास यांनी अधीक माहिती सांगताना सांगितले की शिघरे ते आंबोली भागात हा रोग आल्याची माहिती मिळत असून त्वरित या भागाचा दौरा करून जर करपा रोग असेल तर द्रव मिश्रण रसायन फवारणीची उपाय योजना तातडीने करण्यात येणार आहे यासाठी प्रत्यक्ष घटना स्थळी जाऊन कृषी सहायक याना पहाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अवश्य वाचा