चिपळूण 

कुणबी समाज संघ मुंबई ,खेड मर्यादित आणि ग्रामीण यांच्यातर्फे व्यवसाय समाजभूषण पुरस्कार संदीप फडकले यांना आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी देण्यात येणार आहे. संदीप फडकले हे अजगनी येथील रहिवासी असून संपूर्ण खेड तालुक्यांमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .याची दखल घेऊन कुणबी समाज उन्नती समाजोन्नती संघाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे .कुणबी समाजोन्नती संघ मुंबई खेड मर्यादित आणि ग्रामीण यांचा ९९ वा वर्धापन दिन आणि समाजनेते माजी आमदार  तू बा कदम यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सदरचा कार्यक्रम एल पी इंग्लिश स्कूल शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक ओळंबे (कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई मर्या खेड अध्यक्ष) असणार आहेत.

याप्रसंगी अमित कदम,श्रीकांत कदम,ऍड शितल ओकटे मॅडम,मुरलीधीर बुरटे,परेश कदम,प्रदीप घाणेकर,निलेश पंडम, आदी उपस्थित राहणार आहेत.

 

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत