चिपळूण

विधानसभा २०१९ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आघाडी घेतली असून उद्या दिनांक १ ऑक्टोबर रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम अर्ज दाखल करणार आहेत .या पार्श्वभूमीवर नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न झाली. अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाली नसली तरी शेखर निकम यांच्यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यामुळे उद्या अर्ज भरण्याच्या दिवशी दोन्ही पक्ष आणि आघाडीतील समविचारी पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त झालेल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता .यामुळे राष्ट्रवादी आणि आघाडीतील सर्व पक्षांना उभारी मिळाली आहे. अर्ज वितरित करण्याच्या पहिल्या दिवशी दिनांक २७ सप्टेंबर रोजी शेखर निकम यांच्या नावाने अशोक विचारे यांनी चार अर्ज घेतले आहेत.अद्याप इतर पक्षांनी कोणीही अर्ज घेतले नाहीत. या प्रक्रियेला एक ऑक्टोबरपासून खऱ्याअर्थाने सुरुवात होण्याचे शक्यता असून दिवसेंदिवस विधानसभेच्या रणधुमाळीला अधिक रंगत येईल असेच चित्र सध्या दिसून येत आहे

अवश्य वाचा