चिपळूण

  तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कला महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मान्सून शैक्षणिक सहल टेरव येथील शरदरावांची वाडी येथे आयोजित करण्यात आली होती. सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र शिल्प कला महाविद्यालय आता फक्त कले पुरते मर्यादित राहिली नसून कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी कशी जपावी यासाठी पण नवनवीन उपक्रम राबवित असते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कलामविद्यालयाची शैक्षणिक सहल ही चिपळूण येथे स्थित असलेल्या टेरव येथील शरद रावांची वाडी या निसर्गरम्य ठिकाणी नेण्यात आली. तेथील निसर्ग, वातावरण तसेच देवीचे मंदिर व गावातील परिसर हे मुलांना प्रत्यक्षरीत्या अनुभवता यावा व तो कागदावर तसाच उतरवावा यावा हा प्राथमिक उद्देश महाविद्यालयाचा होता. शैक्षणिक सहलीचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथील कलाशिक्षक माननीय चित्रकार श्री दिगंबर मांडवकर यांनी कला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिले. व तसेच तेर येथील माननीय शरदराव कदम यांचे सहकार्य लाभले.

 टेरव या ठिकाणी तयार केलेल्या कलाकृतीचे चिपळूण अथवा रत्नागिरी येथे कला प्रदर्शन भरणार असून विक्रीसाठी ठेवणार आहे. यातून मिळणाऱ्या रकमेतून यावर्षी पावसाळी नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांचे आर्थिक नुकसान तसेच जीवित हानी झाली. या आर्थिक नुकसानाला  जरासा  हातभार म्हणून यावर्षी  पूरग्रस्तांना मदत निधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

 याप्रसंगी कला महाविद्यालयाचे चेअरमन माननीय श्री प्रा. ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार माननीय प्रकाश अर्जुन राजेशिर्के व कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव हे उपस्थित होते.

अवश्य वाचा