चिपळूण 

चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जाग्रुत श्रध्दास्थान *श्री ग्रामदेव  जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट* , चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही *नवरात्र महोत्सव आश्विन शुध्द रविवार  दि .२९ सप्टेंबर  पासून आश्विन शुध्द दशमी ( दसरा ) मंगळवार  दि .०८ ऑक्टोबर* रोजी पर्यंत *ग्रामदैवते  श्री जुना काळभैरव मंदिर  , श्री देव  केदारेश्वर मंदिर ( वैश्यवसाहत ), श्री देवी ऐकविरा मंदिर ( वडनाका ),श्री देवी भवानी मंदिर , श्री कात्रादेवी मंदिर ( श्री क्षेत्र गांधारेश्वर )* चिपळूण येथे विविध *धार्मिक व सांस्क्रुतिक कार्यक्रमाच्या* आयोजनाने पारंपरिकरित्या साजरा  होत आहे .

*त्यानिमीत्त श्री ग्रामदेव जुना काळभैरव मंदिर , चिपळूण येथे आयोजित नवरात्र उत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे -*

*रविवार  दि .२९ सप्टेंबर*  रोजी सकाळी  *श्री देव घटी बसविणे ( नवरात्र उत्सव प्रारंभ )* श्री देव काळभैरव - श्री देवी योगेश्वरी , श्री देव केदार - श्री देवी जाखमाता , श्री देवी ऐकविरा, श्री देवी भवानी , श्री कात्रादेवी यांची  *घटस्थापना* , सायंकाळी ५ ते ७  कै .वामनराम साडवीलकर संस्थापीत, *स्वरदर्शन कलाकुंज* प्रस्तुत *संगीत स्वरसखी* हा  महिलांचा विशेष सहभाग असलेला संगीत कार्यक्रम होईल .रात्रौ १० ते १२ *श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ ( ओझरवाडी )* ,चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*सोमवार दि .३० सप्टेंबर*  रोजी सायंकाळी ५ ते ७ *श्री सिद्धी प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( पाग )* ,चिपळूण , रात्रौ १० ते १२ *श्री काळभैरव प्रासादिक संगीत भजन मंडळ ( शंकरवाडी )* चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*मंगळवार  दि .१ ऑक्टोबर* रोजी सायंकाळी ५ ते ७ *स्नेहवर्धिनि महिला  मंडळ* प्रस्तुत *संगीत वस्त्रदालन* हा वस्त्रांची संगीतमय ओळख  कार्यक्रम होईल .रात्रौ १० ते १२ *श्री गांधारेश्वर  प्रासादिक संगीत भजन मंडळ ( शंकरवाडी )* चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*बुधवार  दि .२ ऑक्टोबर* रोजी *ललिता पंचमी* सकाळी ९ वाजता *कुंकूमार्चन* धार्मिक विधी , सकाळी १० वाजता *कुमारिका पूजन* सहभाग - *कन्या शाळा चिपळूण* , सकाळी १० वाजता *सप्तशती पाठ वाचन* , सामुदायिक सहभाग - *श्री कात्यायनी महिला मंडळ , चिपळूण* ' , सायंकाळी ५ ते ७ *श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला  संगीत भजन मंडळ , चिपळूण*. रात्रौ  १० ते १२ *नवयूग प्रासादिक संगीत भजन मंडळ , श्री .पांडुरंग भेकरे , चिपळूण* यांचा कार्यक्रम होईल .

*गुरुवार  दि .३ ऑक्टोबर* रोजी सायंकाळी ५ ते  ७ *परिमल ग्रुप* चिपळूण प्रस्तुत *जागर लोककलेचा* नाट्य - संगीत - न्रुत्य कार्यक्रम होईल , रात्रौ ९ ते ११ *श्री दत्त  प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ ( बळीपवाडी ) पन्हाळा .कोल्हापूर*  त्यानंतर ११ ते १ *श्री श्रीराम  प्रासादिक संगीत भजन मंडळ ( वैश्यवसाहत )*  चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*शुक्रवार  दि .०४ ऑक्टोबर* रोजी सायंकाळी ५ ते ७  *नृत्यमल्हार कत्थक अकादमी*  निर्मित *तालअभिषेक* , सौ .स्कंधा चितळे आणि विध्यार्थीनी  , रात्रौ ९ ते ११ *श्री विश्वकेदार  प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ ( पवारआळी )* चिपळूण , रात्रौ ११ ते १ *श्री माऊली  प्रासादिक  वारकरी संगीत भजन मंडळ ( पवारआळी )* चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*शनिवार  दि .०५ ऑक्टोबर* रोजी *उपवास* सायंकाळी  ५ ते ७ *पारंपारिक भोंडला* ( १२ वे वर्ष ) सादरकर्ते - *सहेली ग्रूप* चिपळूण रात्रौ ९ ते ११ *श्री हनुमान  प्रासादिक संगीत भजन मंडळ  ( पाग )* यांचा कार्यक्रम होईल .

*रविवार दि .६ ऑक्टोबर* रोजी सकाळी *श्री देव घटी उठविणे , उत्थापन /बलिदान* श्री देव काळभैरव -श्री देवी जोगेश्वरी , श्री देव केदार -श्री देवी जाखमाता , श्री देवी ऐकविरा , श्री देवी भवानी , श्री कात्रादेवी ( उत्थापन )*, सायंकाळी ५ ते ७ कै .वामनराव साडविलकर संस्थापीत *स्वरदर्शन कलाकुंज* प्रस्तुत , *संगीत मन वढाय वढाय* ( बहिणाबाईंची गाणी ) , रात्रौ १० ते १२ *नवयुवक*  प्रासादिक संगीत भजन मंडळ *( कांगणेवाडी खेण्ड  )* चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*सोमवार  दि .७ ऑक्टोबर* रोजी 

सायंकाळी ५ ते ७  *ग्रामीण झीम्मा फुगडी* आदी न्रुत्य  कार्यक्रम सादरकर्ते *श्री गणेशवाडी ग्रामस्थ महिला मंडळ* , गणेशवाडी , रावतळे चिपळूण , रात्रौ ९ ते ११ *श्री साईशंकर प्रासादिक संगीत भजन मंडळ (वरची भोईवाडी )* चिपळूण रात्रौ ११ ते १ *श्री सुकाई  देवी प्रासादिक संगीत भजन मंडळ ( पाग नाका )* चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

*मंगळवार दि .०८ ऑक्टोबर* रोजी 

*विजयादशमी ( दसरा )* दुपारी ३ वाजता *श्रीं चे सीमोल्लंघन* , सोने लुटण्यासाठी *श्रीं ची सवाद्य सहित शाही मिरवणूक*  विशेष सहभाग *श्री विघ्नहर्रता नाशिक ढोल झाँज ध्वज पथक* चिपळूण आणि *कलारत्न ग्रूप* चिपळूण .त्यानंतर *श्रीं चा दर्शन सोहळा* , सायंकाळी ६ वाजता *शिवकालीन युध्दकला सरिपट्टा खेळ* सादरकर्ते *श्री गणेश मित्र मंडळ* ( गणेशवाडी ) रावतळे चिपळूण पुरस्कृत *श्री काळभैरव सरिपट्टा ढोल झाँज ध्वज पथक* आणि *ओझरवाडी ग्रामस्थ मंडळ* पुरस्कृत *शिवध्वनी ढोल झाँज पथक ( ओझरवाडी )* चिपळूण यांचा कार्यक्रम होईल .

नवरात्र उत्सव कालावधीत नित्यनियमीत *सकाळी श्रींची पूजा अर्चा , रात्रौ ७:३० वाजता  धूपआरती नंतर श्री काळभैरव ध्यान , स्तोत्र , अष्टक , कवच पठन , रात्रौ ९ ते १ भजनादी  कार्यक्रम* नित्यनियमित होतील याची भाविकांनी नोंद घ्यावी .

भक्तगण नागरिकांनी नवरात्र उत्सवात श्रींच्या सेवाकार्याचा लाभ घ्यावा .असे आवाहन *श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट* , चिपळूण तर्फे *व्यवस्थापकीय विश्वस्त श्री .किशोर शेट्ये , श्री .समीर शेट्ये , महाजन विश्वस्त ( सचिव ) श्री . पंकज कोळवणकर , कार्यकारी विश्वस्त श्री. चंद्रशेखर लाड, श्री .सुमन्ता शिंदे*  आणि *नवरात्र उत्सव कमिटी अध्यक्ष श्री .दीपक खातू यांनी केले आहे.

अवश्य वाचा