फादर्स डे च्या निमित्ताने वडिल आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित कव्हर सॉंग बाबा याचे यु ट्यूबवर प्रदर्शन पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले.

अतिशय हृदयाला भिडणारा असं गाणं आणि त्याचा विडिओ सुद्धा डोळ्यात पाणी आणणारा आहे.

या गाण्याचे दिग्दर्शन विशाल सिद्धार्थ गायकवाड याने तसेच वैष्णवी म्हात्रे हिने हे गाणे गायले आहे.

या मध्ये कलाकार वैष्णवी म्हात्रे, संजय रेडीज, मंदार मधुकर पाटील, डॉक्टर राजश्री चांदोरकर, सारा कांबळे, अरिंन कांबळे या कलाकारांनी अभिनय केला आहे. तसेच संगम भगत ने अतिशय सुंदर म्युझिक केले आहे तर सिनेमॅटोग्राफ़्री सुनीत गुरव याने आणि गाण्याचे रेकॉर्डिंग माऊली स्टुडिओ मध्ये करण्यात आले.

Sina vision या you tube channel var हे गाणं प्रसारित करण्यात आले आहे.

प्रदर्शित प्रसंगी पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटिल, कलाकार वैष्णवी म्हात्रे, मंदार पाटील, विशाल  गायकवाड, विक्रांत वार्डे, दिपक काळेल आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा