उरण

कलकत्ता येथील NRS मेडिकल कॉलेज मधे ८० वर्षांच्या रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यू प्रकरणी तेथील डॉक्टर्सवर सुमारे २०० लोकांच्या मॉबने प्राणघातक हल्ला केला. वारंवार होणाऱ्या या घटनांचा व समाजातील विकृतीचा निषेध म्हणून भारतातील सर्व वैधकीय संघटनांबरोबर I M A ,R M A ने पुकारलेल्या भारत बंद ला उरण मेडिकल वेलफेअर असोसीएशन (UMWA) यांनी पाठिंबा देऊन भारत बंद मधे सहभागी होणार आहेत . शासनाकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवार (दि. १७) जून २०१९ रोजी उरण तालुक्यातील सर्व दवाखान्या मधील सेवा(OPD) पूर्णदिवस बंद राहतील. सर्वसामान्यांच्या गैरसोयीबद्दल व होणाऱ्या त्रासाबद्दल उरण मेडिकल वेलफेअर असोसीएशन दिलगिरी व्यक्त केली आहे.

बंद मध्ये ही रुग्णांसाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनचे डॉक्टर्सहि सेवा देतील .अशी माहिती उरण मेडिकल वेलफेअर असोसीएशनचे अध्यक्ष डॉ .संजीव म्हात्रे व सेक्रेटरी अजय कोळी यांनी दिली.

अवश्य वाचा