सुधागड /पाली दि. १६ जून२०१९

      वाकण ते पाली फाटा हा राष्ट्रीय महामार्ग करण्याचे काम सुरु आहे. या कामात दिवसेंदिवस प्रगती आहे. वाहतुकीच्या सुरक्षितेच्या बाबतीत ठेकेदार कडुन  उपाययोजना ही करण्यात आली नाही.काळजी न घेता पाली पाली-खोपोली मार्गावरील दुधाने वाडी येथे मोरीचे काम चालू सुरु आहे. त्या करीता रस्त्याची एक बाजू तोडण्या ही आली आहे.

 दिनांक १५ जून रोजी रात्री ११.वाजता  सुमारास क्रेटा एम.एच.०२एफ.ई.२१०६  या क्रमांकाची गाडी पालीच्या  दिशेने  खोपोली  कडे जात असताना  दूधानेची वाडी  गावाच्या तलावाच्या समोर मोरीत पलटी होऊन कारचा अपघात झाला.हा अपघात वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज  न आल्याने तसेच  समोरुन येणा-या वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशाने  रस्त्यांचा अंदाज न आल्यामुळे गाडी क्रमांक ही  काम चालु असलेल्या मोरी पलटी झाली.नशीब बलोत्तर म्हणून जिवीत हानी झाली नाही.हा अपघात वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने झाला असल्याचे प्राथमिक अंदाजाने समजते.

पाली -खोपोली रस्त्यांचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी जो रस्ता आहे तो अरुंद असल्यामुळे तसेच सुरक्षेच्या बाबतीत फलक  नसल्यामुळे  व सुरक्षेतेच्या   प्रकारची सोय नसल्यामुळे असे  अपघात होत असतात ठेकेदाराने ही सुरक्षतेच्या बाबत काळजी घेणे गरजेचे आहे तसेच
वाहतुकीची काळजी वाहन चालकांनी घेणे ही गरजेचे आहे.

वाकण-पाली-खोपोली रस्त्याच्या चौपदरीकरण्याचे काम सुरु आहे.ज्या ज्या ठिकाणी मोरी, रस्त्याची कामे चालू आहेत.आशा ठिकाणी ठेकेदाराने सुचना फलक लावणे गरजेचे आहे. जेणे करुन आपघात होणार नाही.

अवश्य वाचा