महाड-दि.१६ जुन

महाड पोलादपुर तालुक्यांतील पाणी टंचाई ग्रस्त असलेल्या नातोंडी धारेचीवाडी आणि पोलादपुर तालुक्यांतील वाकण मुरावाडी या गावांना नुकतीच जागतिक बॅकेच्या पथकाने भेट दिली.रायगड जिल्ह्या मध्ये महाड आणि पोलादपुर तालुके अत्यंत दुर्गम असुन उन्हाळ्या मध्ये या दोनही तालुक्यांतील गावांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

महाड तालुक्यांतील नातोंडी धारेची वाडी आणि पोलादपुर तालुक्यांतील वाकण मुरावाडी येथील ग्रामस्थां बरोबर पथकांतील सदस्यांनी सविस्तर चर्चा केली.या दोनही गावांमध्ये जागतिक बॅकेच्या सहकार्यातुन पिण्याच्या पाण्याची सोय करण्यांत आली असुन या मुळे गावांतील महिला लहान मुलांना डोक्या वरुन पाणी वाहुन आणण्याचा त्रास कमी झाला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.धारेची वाडी गावांतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी संपुर्ण रात्र जागुन काढावी लागत होती,त्यामुळे गावांतील महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते.जागतिक बॅकेच्या मदतीने पाण्याची सोय झाल्यामुळे वेळ आणि श्रम याची बचत होत असल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

जागतिक बॅकेच्या पथकाचे प्रमुख राघवा,मुर्ती मरिअप्पा कुलाप्पा,निर्मला चोप्रा तर राज्यस्तरा वरुन आलेले श्री रहेमान,मुंबई मंत्रालयांतील पाणी पुरवठा विभागाचे राहूल ब्राम्हणकर,मंगेश भालेराव,रायगड जिल्ह्या ग्रामिण  पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता वसंत राठोड,तुषार राठोड,सेवा संस्थेचे जगन्नाथ साळुंके,पोलादपुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदी मान्यवरांसह नातोंडी ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप हळदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याच बरोबर उप कार्यकारी अधिकारी साळूंके यांचे विषेश सहकार्य लाभले.

अवश्य वाचा