पाताळगंगा २५ सप्टेंबर ,

      परतीच्या पावसाच्या भीतीने शेतक-यावर मोठे संकट निर्माण झाल्याने आलेले पिक नष्ट होण्याच्या मार्गावर असून शेतक-या मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.मागील काही दिवसापासून परतीच्या पावसाने शेतक-याचा अंदाज चुकवला आहे.वारा,वीज,पाऊस हे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शेतक-यांचे शेतीचे नुकसान होत आहे.

       तर काही ठिकाणी भात शेतीला पूर्ण पिक आले असून .भाताच्या लोंब्या मध्ये दाना निर्माण होत असताना,त्याच्या वजनाने भातशेती पडत असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. भात शेती उत्तम पिक आल्याने शेतक-याच्या तोंडाशी आलेले घास वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतादायक झाला आहे.

         वर्षभर पावसाची चातकाप्रमाणे वाट पहावी आणि आणि पाऊस पडल्याने भातशेती लावावी त्याच्या साठी लागणारे खत,बियाणे,मजूर ई खर्चाने शेतक-यांची कंबर मोडून जाते.भात शेती उत्तम पिकली म्हणून शेतकरी आनंदी होतो. पण शेवटच्या क्षणाला शेक-यांचे शेतीचे नुकसान हि परस्थिती दर वर्षी आपणास पहावयास मिळते.

          अशा अनेक कारणाने शेतकरी वर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे.अनेक ठिकाणी भात शेतीला उत्तम पिक आले असून वरून राजाची दृष्ट लागली की काय ? या विचाराने बळीराजाला चिंतेने ग्रासले असून बळीराजा परतीच्या पावसाच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे.

 

अवश्य वाचा