महाड-दि.१६ जुन

महाड ते किल्ले रायगड मार्गावरील साईड पट्टी पहिल्याच पावसा मध्ये धोकादायक बनल्याने अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली असुन गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे किल्ले रायगड कडे येणाNया पर्यटकांची वाहाने रस्ता सोडून खड्ड्यात कोसळत असल्याने हा मार्ग पुर्णपणे धोकादायक झाला आहे.रस्त्याच्या बाजुला असलेल्या कमकुवत साईड पट्टीमुळे अपघातामध्ये वाढ झाली असुन साईड पट्टीचे मजबुतीकरण करण्यांत यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

किल्ले रायगडचे सुशोभिकरण आणि संवर्धनाचे काम प्रधिकरणा मार्पâत सुरु असुन रायगडसह या परिसरांतील २१ गावांतील विकासाची कामे या मध्ये अंतर्भूत करण्यांत आली आहेंत.त्याच बरोबर माणगाव व्हाया पुनाडे पाचाड रायगड या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु करण्यांत आल्या नंतर महाड ते कोंझर,पाचाड किल्ले रायगड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यांत आले आहे.रुंदीकरणाचे काम केले जात असताना या मार्गावरील वाहातुकीला धोका निर्माण झाला असुन गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या पावसाने या मार्गा वरील साईड पट्टीची दुरावस्था झाली असुन कमकुवत बनली आहे.त्या मुळे या मार्गा वरुन जाणाNया वाहानांना धोका निर्माण झाला आहे.नुकताच रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यांत आला,या निमित्ताने राज्यांतुन हजारो शिवभक्त उपस्थित राहीले.प्रशासनाने सर्व वाहाने चापगाव कोझर परिसरांमध्ये पार्वâ करण्याच्या सुचना दिल्याने खाजगी बसेस ज्या मोकळ्या जागे मध्ये पार्वâ करुन ठेवल्या होत्या त्या पावसामुळे जमीनीमध्ये खचल्याने शिवभक्तांची फार मोठी गैर सोय झाली,अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.अखेर पोलिसांनी महाड मधुन व्रेâन,जेसीबी इत्यादी यंत्रणेला पाचारण केल्या नंतर दुपार नंतर सर्व वाहाने बाहेर काढण्यांत यश आले.

महाड (नातेखिंड) ते रायगड हा २४ किलो मिटर अंतराचा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागा कडून मागिल वर्षा पासुन सुरु करण्यांत आले.रुंदीकरणाचे काम केले जात असताना साईड पट्टीची दुरुस्ती करण्यांत आली नाही,रस्त्याच्या बाजुला टाकरण्यांत आलेल्या मातीच्या भरावा मुळे अनेक वाहानांना अपघात होत आहेंत.पावसाला सुरवात झाल्या नंतर दरवर्षी या रस्त्यावरील साईड पट्टीची समस्या निर्माण होते,या बाबत स्थानिक ग्रामस्थांनी संबधीत विभागा कडे तक्रारी करुनही दुर्लक्ष करण्यांत येते.रस्त्यावरील खड्डे मातीने भरण्याचे काम सुरु करण्यांत आल्याने पावसाच्या पाण्याने रस्त्यावर मातीचा चिखल होऊन दुचाकी चारचाकी वाहानांच्या अपघाता मध्ये वाढ झाली असुन या बाबत वेळीच प्रशासना कडून योग्यती कार्यवाही करण्यांत यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

अवश्य वाचा