सांगोला

     तालुक्यात यंदा 23 हजार 517 हेक्टर इतक्या क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे. सध्या बाजरीचे 60 टक्के पीक फुलोरा अवस्थेत तर 40 टक्के पीक पोटरी अवस्थेत असून पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. तूर, सूर्यफूल, मूग, भुईमूग वाढीच्या अवस्थेत आहेत. परिणामी यंदा पावसाअभावी खरिपातील पिके धोक्यात आली असून बाजरी व मका पिकावरील संकटाचे ढग गडद झाले असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहाजिकच वरुणराजा ने सांगोला तालुक्याकडे पाठ फिरवल्यामुळे खरीप पिकांचा भरोसाच नाही.

     पावसाच्या भरवशावर यंदा सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी 27 हजार 779 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे. 23 हजार 517 हेक्टरवर बाजरी, 3 हजार 464 हेक्टरवर मका, 192 हेक्टरवर तूर, 78 हेक्टरवर उडीद, 75 हेक्टरवर मूग, 46 हेक्टरवर भुईमूग, 283 हेक्टरवर सूर्यफूलाची पेरण्या केल्या आहेत. तर जनावरांना चाऱ्याची सोय करण्यासाठी 187 हेक्टरवर मका आणि 1 हजार हेक्टरवर कडवळ चारा पिकांची पेरणी झाली आहे. 

     गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सांगोला तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. सरासरीपेक्षा यंदा 52 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सांगोला मंडलमध्ये 166 मिमी, संगेवाडी मंडलमध्ये 132 मिमी, महूद मंडलमध्ये 137 मिमी, हातीद मंडलमध्ये 281 मिमी, शिवणे मंडलमध्ये 135 मिमी, नाझरा मंडलमध्ये 169 मिमी, कोळा मंडलमध्ये 195 मिमी, सोनंद मंडलमध्ये 176 मिमी, जवळा मंडलमध्ये 190 मिमी असा सरासरी 176 मिमी पाऊस झाला आहे.

    तालुक्यात 23 हजार 517 हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. त्यापैकी 60 टक्के पीक फुलोरा अवस्थेत तर 40 टक्के पीक पोटरी अवस्थेत असून पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. तूर, सूर्यफूल, मूग, भुईमूग वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु पावसाने ओढ दिल्याने बाजरी व मका पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. 

     यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या आनंद वार्तामुळे बळीराजा सुखावला होता. मात्र सांगोला तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाळा संपत आला असला तरी अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसावर खरिपाची पिके हिरवी दिसत असली तरी त्यांची उत्पादन क्षमता घटली आहे. खरिपातील पिके पावसाअभावी सुकून चालली आहेत. यामुळे यंदा खरिपाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा