खेड 

खेड शहराच्या  बाजारपेठेतील ओमसाई मोबाइल शॉपी फोडून तेथून साडेपाच लाख रुपये किमतीचे ४१मोबाइल चोरून नेणाऱ्या  चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई येथून मुद्देमालासह अटक केली.

सदर संशयित चोरट्याचे नाव तुषार रामचंद्र  गावडे मुळगाव तिसे खेडअसे आहे. त्याने चोरीची कबुली देऊन त्याच्या ताब्यात असलेल्या साडेपाच लाख रुपये किमतीच्या ४१ मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या मोबाईल शॉपच्या झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी  विविध भागात चोरट्यांच्या मागावर  पथके तयार करून पाठविले होती. पोलिसांनी मुंबई येथेही खबऱ्यांमार्फत  तपास सुरू ठेवला होता. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅन्टॉप हिल मुंबई येथे जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.  आरोपीने या चोरी अतिरिक्त गणेश गिल्डा यांच्या दुकानातील तीन एलईडी चोरल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस कॉन्स्टेबल संजय कांबळे, शांताराम झोरे ,राकेश बागुल, नितीन डोमणे, रमीझ शेख ,दत्ता कांबळे आदींनी यशस्वीरित्या पार पडली.

अवश्य वाचा