चिपळूण 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद रत्नागिरी द्वारा आयोजित १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल चा विद्यार्थी कुमार  चिन्मय होमकर ने अंतिम राउंड मध्ये रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेचे अव्वल स्थान पटकावले .दिनांक १९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा संपन्न झाली .या स्पर्धेमधून निवड झालेल्या पाच खेळाडूंचे प्रतिनिधत्व चिन्मय विभागीय स्पर्धेसाठी करणार आहे. कुमार चिन्मय इयत्ता सातवीमध्ये शिकत असून शाळेतील सर्व उपक्रमात आवडीने भाग घेणारा विद्यार्थी आहे .यापूर्वी अनेक जिल्हास्तरीय व खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांमधून आपल्या बुद्धिमत्तेची झलक त्याने दाखवली आहे .चिन्मय  प्रति रंग चेस अकॅडमी चे श्री प्रवीण सावर्डेकर  ,रश्मी सावर्डेकर ,आई-बाबा व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सुरेश राठोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .त्याच्या या निवडीबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

अवश्य वाचा