चिपळूण 

५ सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.लायनेस क्लब  चिपळूण मार्फत महाराष्ट्र राज्य  पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री .बळीराम मोरे  यांचा रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला .तसेच सण २०१८-१९ या वर्षीचा रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक श्री दीपक मोने यांचाही भेटवस्तू व पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना श्री .बळीराम मोरे  व श्री .दीपक मोने  यांनी लायनेस क्लबच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले.

या सेवा कार्यासाठी लायनेस अध्यक्षा चेतना होमकर, सेक्रेटरी सोनल कारेकर ,खजिनदार स्वाती देवळेकर ,रीजन कॉर्डिनेटर प्राची जोशी ,कॅबिनेट ऑफिसर सीमा चाळके कॅबिनेट ऑफिसर अंजली कदम ,कॅबिनेट ऑफिसर अलका सुराणा , सृती सावर्डेकर ,रश्मी सावर्डेकर   कॅबिनेट ऑफिसर विनया कांरेकर, सुप्रिया गुरव ,लायनेस तेजल ,शमीना  परकार उपस्थित होते.

 

अवश्य वाचा