महाड-दि.२३ सप्टेंबर

अनन्य साधारण ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या,निसर्गाचा वरद्हस्त असलेल्या पोलादपुर तालुक्यांमध्ये अनेक शौर्य स्थळे असुन या तालुक्याला शौर्याचा इतिहास आहे.निसर्ग सौदर्याचा,शौर्य स्थळांचा अनुभव घेण्या करीता पोलादपुर मधील कर्तव्य संस्थे तर्पेâ रविवारी शौर्यस्थळ दर्शन सहलीचे आयोजन केले होते.शालेय विद्यार्थासह त्याचे पालक या सहलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रथम आयोजित करण्यांत आलेल्या शौर्य दर्शन सहलीमध्ये दोनशे पेक्षा अधिक पालक विद्यार्थी सहभागी झाले होते. 

पोलादपुर तालुका ज्या प्रकारे डोगर दNयांनी व्यापलेला आहे त्याच प्रमाणे या तालुक्यामध्ये अनेक शौर्य वीरांची परंपरा देखिल आहे.शाळेतल्या विद्यार्थाना इतिहासाची ओळख व्हावी आणि प्रत्यक्ष इतिहासाचे साक्षिदार कोण होते याची माहिती होण्या करीता कर्तव्य संस्थे तर्पेâ भटवंâती सहलीचे आयोजन करण्यांत आले होते.नैसर्गिक सौदर्याचा आस्वाद घेत मुले मुली आणि त्यांचे पालक दुर्गम भागांत असलेल्या विविध साईट सिन दाखविण्यांत आले.उमरठ या गावांमध्ये असलेला वृक्ष दाखविण्यांत आला याच वृक्षा मध्ये शस्त्रे लपविली जात असल्याची माहिती यावेळी देण्यांत आली.नरवीर तानाजी मालुसरे योंचे समाधीस्थळ,साखर येथील नरवीर सुर्याजी मालुसरे यांचे समाधी स्थळ,बोरज फाटा येथील सांप्रदायिक मठ,संभाव्य गोशाळा,शेलार मामा यांची समाधी,निसर्गरम्य मोरझोत धबधबा,झुलता पुल,सावित्री नदीचे खळखळते पाणी,इत्यादी ऐतिहासिक स्थळांची माहिती महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे एनसीसी युनिटचे योगेश मोरे यांनी दिली. या वेळी नरवीर तानाजी मालुसरे यांचे बारावे वंशज श्रीमती शीतल मालुसरे यांच्याकडे असलेली शिवकालांतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गळ्यांतील कवड्यांची माळ मुलांना दाखविण्यांत आली.साखर येथील सुर्याजी मालुसरे यांचे तेरावे वंशज नरवीर युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल मालुसरे,हनुमंत बाबा मोरे मठाचे मठाधिपती हरिश्चंद्र महाराज मोरे,पोलादपुर तालुका युवक संघटनेचे अध्यक्ष रामदास कळंबे,यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.

पोलादपुर तालुक्यांतील ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळण्या करीता आयोजित करण्यांत आलेली सहल यशस्वी करण्या करीता सचिन मेहता,श्रीमती मोनिका भुतकर,अ‍ॅड प्रशांत भुतकर,धनश्री सुळ,गोपिचंद घाडगे,अ‍ॅड.सारिका पालकर,देवेंद्र दरेकर,प्रिया साळुंके,नुतन जाधव,अशोक बुटाला व संस्थेच्या सर्व कार्यकत्र्यानी विषेश परिश्रम घेतले.

अवश्य वाचा