पंढरपूर

‘स्वेरीमधील विद्यार्थ्यांमध्ये असणारी शिस्त, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात असलेला आदरपूर्वक संवाद, पंढरपूर पॅटर्न, पंढरपूर इन प्रोफेशनल एज्युकेशन यासह इतर अनेक शैक्षणिक बाबी अनुकरणीय आहेत. या शिक्षणाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला आणखी गती मिळत असून प्रचंड परिश्रम करण्याची तयारी महाविद्यालयीन जीवनात होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची कार्यक्षमता आणखी वाढत आहे. म्हणून स्वेरीचे नाव राज्यात अधिक प्रमाणात घेतले जात आहे.’ असे प्रतिपादन जयासिंगपुरच्या डॉ जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत यांनी केले.

स्वेरीमध्ये नियमित राबवीत असलेले शैक्षणिक उपक्रम आणि व्यवस्थापनाबद्धल माहिती जाणून घेण्याच्या उद्धेशाने जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत व प्राध्यापक वर्ग यांनी स्वेरीला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्वेरीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्धल ते गौरवोदगार काढत होते.  यावेळी प्राचार्य डॉ. सावंत यांच्यासोबत मगदूम महाविद्यालयाचेच शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. पी.आर.कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. पी.पी. पाटील, रजिस्ट्रार ए.बी. घोलप यांच्यासह इतर स्टाफ उपस्थित होते. प्रारंभी स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी मगदूम महाविद्यालयातील प्राचार्य व स्टाफचे स्वेरीच्या वतीने स्वागत केले. डॉ. मगदुम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक वर्गांनी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संशोधन, वर्कशॉप, प्रवेश प्रक्रिया, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आदी महत्वपूर्ण विभागांची माहिती जाणून घेतली. यामध्ये संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचे मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने  शैक्षणिक वाटचाल सुरु असल्याचे त्यांना जाणवले, यावेळी त्यांनी स्वेरीतील शिक्षकांचे शोध प्रबंध, शोध निबंध याचे कौतुक केले. यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ आदी प्राध्यापक वर्ग.

अवश्य वाचा