श्रीवर्धन 

      बौद्ध हितकारिणी सभा, ता. श्रीवर्धन या संस्थेच्या वतीने दि. 16 जुलै 2019 पासून वर्षावास धम्म प्रबोधन मालिका सुरु आहे. रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी या मालिकेतील 11 वे पुष्प दिनेश रामदास खैरे यांनी गुंफले. त्यामध्ये त्यांनी "सिगाल सुत्त" हा विषय उत्तम रीत्या स्पष्ट केला. प्रबोधनकार अमित यांनी कर्मक्लेश आणि शील यांची सांगड घालून उपोसथ व्रत कसे केले जाते याविषयी संपूर्ण माहिती दिली. बाळाराम पवार यांनी मागील कार्य- कारिणीचा गुणगौरव करुन नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. सुदाम साखरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या तर कु. मयुरी राहूल गायकवाड हिनेही आपले विचार मांडले. श्री. दिलीप हेंद्रे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, आपण सर्व ओबीसी, बी. सी. घटकांतील सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक अध्यक्ष हरिश्चंद्र रामा जाधव होते. या कार्यक्रमाला विभागातील शेकडो उपासक, उपासिका, ज्येष्ठ नागरिक व छोटेखानी कंपनी उपस्थित होती.

          उपस्थितांमध्ये प्रामुख्याने मुंबई अध्यक्ष संजय मोरे, बाळाराम पवार, सुदाम साखरे, देवदास पवार, वसंत चाफे,गौतम साखरे, सुजित जाधव, काशिनाथ लोखंडे, मानसी साखरे, मेघा शिर्के, सुप्रिया मोरे, मालती खैरे, सुगंधा पवार,वंदना पवार, हेमलता जाधव, शांता जाधव, प्रणाली येलवे, प्रतिभा जाधव, प्रिया खैरे, अनुसया उंबटकर, विजयमाला साळवी, सुदाम जाधव, वंदना मोरे, समिता मोरे, दिप्ती शिर्के निर्मला गायकवाड, संगीता सरवदे, नेत्रावती सुरवसे, संध्या येलवे, सिंधु येलवे, उज्ज्वला खैरे, सुनिता वडमारे, सोनम लोखंडे आदि कार्यकर्ते, उपासक, उपासिका यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर चिटणीस दिपक  बाळाजी शिर्के यांनी केले. कार्यक्रमाला संस्कार विभागाचे अध्यक्ष देवदास विठ्ठल पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.चिटणीस सुजित जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणानंतर सरणंतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

अवश्य वाचा