दिघी 

या वर्षी समुद्र किनाऱ्यावरील विविध घटनांनी समाज मन सुन्न झाले आहे .05 सप्टेंबर ला श्रीवर्धन च्या दांडा भागातील समुद्र किनाऱ्यावर एक इसम मृत अवस्थेत आढळला होता .दांडा येथील रहिवासी योगेश मांजरेकर यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात त्या विषयी फिर्याद दाखल केल्या नंतर पोलीस नाईक एस .जी .गुरव यांनी घटनास्थळी जाऊन सदरच्या मृत्यूदेहाचा पंचनामा केला .लाल रंगाचा शर्ट , काळा बरमुडा असलेल्या मृत्य देहाची उंची साधारणतः पाच  फूट सहा इंच होती .मृत्युदेह जास्त कुजलेला असल्याने पोलीसानी पंचनामा केल्या नंतर तात्काळ त्याचे दफन केले .आज घटनेस 15 दिवस उलटून गेले आहे परंतु आज ही मृतदेहा संदर्भात कुणी श्रीवर्धन पोलीस ठाण्या कडे विचाराना करण्यासाठी आलेले नाही .श्रीवर्धन पोलीस ठाण्या कडून सदरचे वृत्त सर्व पोलीस ठाण्या कडे पाठवलेले आहे तरी सुद्धा कुणी व्यक्ती सदरच्या मृत्य व्यक्ती विषयी विचारणा केलेली नाही त्या कारणे  मृतदेहाचे गूढ वाढलेले आहे .

अवश्य वाचा