खोपोली

खोपोलीतील प्रख्यात चित्रकार दिपक पाटील यांनी केलेल्या स्केचेस ने साकारले गेलेले "अंतर्नाद" हे  पुस्तक भारतीय वंशाचे व अमेरिकेत स्थाईक असलेले डॉ. विनोद शहा यांनी काल २२ सप्टेंबर रोजी अमेरिकेत "हाऊडी मोदी" या कार्यक्रमाचे ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. या पुस्तकाची संपूर्ण संकल्पना डॉ विनोद शहा यांची आहे. आंतर्नाद या पुस्तकात रामराज्य ते 2030 साली भारत देश कसा असावा हे स्केचेस (Illustrations)  व  लिखाणातून दर्शवले आहे. हे पुस्तक भारतातील नामवंत व्यक्तींना ही भेट स्वरूपात दिले जाणार आहे. तसेच राजकीय, औद्योगिक, कला क्षेत्रातील नामवंत लोकांनी देशाच्या विकासासाठी सहभाग द्यावा असे आवाहन केले जाणार आहे. या पूर्वी श्री. विनोद शहा यांनी बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना अशाच स्वरूपाचे पुस्तकरूपी एक पत्र लिहिले होते व त्या सोबत अमेरिकेतील मागील वर्षांचा आढावा व त्रुटी दर्शवल्या होत्या.ओबामा यांच्या कडून अमेरिकन लोकांच्या अपेक्षा काय आहेत, हे पत्र व फोटो स्वरूपातील पुस्तकात दर्शवले होते. अंतर्नाद या पुस्तकाचे काम देण्यापूर्वी श्री.विनोद शाहा यांनी सन २०१४ साली दिपक पाटील यांच्याकडून त्यांचे अमेरिकेतील मित्र  स्टेनी हय्यर जे अमेरिकेच्या मुख्य नेत्यान पैकी एक आहेत यांच्या स्वर्ग वासी पत्नी जुडी हय्यर यांचे तैल चित्र चित्रीत करून घेतले होते. तसेच पाटील यांच्या ठाणे येथील चित्र प्रदर्शनातून एक निसर्गचित्र ही खरेदी केले होते. शहा हे गेली अनेक वर्षे अमेरिकेत डि. सी. वॉशिंग्टन येथे आपल्या संपूर्ण कुटूंबासह राहतात.शहा हे इतके वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असले तरी त्यांची नाळ भारताशी जोडली आहे, हे अंतर्नाद या पुस्तकातील विचारांनी जाणवते. या पुस्तकाचे काम खुपच कमी कालावधीत पुर्ण करायचे असल्याने चित्रकार संजय शेलार - कोल्हापूर, नवनाथ चोभे - अहमदनगर, सुभम बाविस्कर - शिरपूर, भटू बागले- मुंबई, ऋचा प्रसाद लिमये - ठाणे  यांचे अमूल्य सहकार्य मिळाले. तसेच या पुस्तकाचे संपूर्ण डिझाईन  किशोर पाटील यांनी केले आहे.या कामासाठी निवड केल्या बद्दल दिपक पाटील यांनी  विनोद शहा व केतन शहा यांचे आभार व्यक्त केले.

 

अवश्य वाचा